भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेतले जाणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.
आमदारांचे निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे. मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे साठ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 18 जानेवारीला आहे. त्या दिवशी न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले होते. याविरोधात निलंबित आमदारांनी न्यायालयात धाव घेतली.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मुळात ज्या पद्धतीने भाजपाच्या आमदारांचे निलंबन झाले, तो प्रकारच चुकीचा होता. ते विधानभवनाच्या प्रथा परपंरांना धरून नव्हते, आमच्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आली.
भाजपाच्या आमदारांना विधानसभेबाहेर ठेवण्याचा हा खोडसाळ डाव होता, आम्ही नियमाला धरून विधिमंडळाकडे गेलो होतो, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही याविरोधात न्यायालयाकडे दाद मागितली. विधिमंडळात नाही मिळाला तर सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
न्यायालयात तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय नक्कीच मिळेल असे भाजप नेते अशिष शेलार यांनी म्हटले आहे.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….