स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका आमंत्रित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 11 जानेवारी :- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2021 करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावयाच्या आहेत
या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2021 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. 31 जानेवारी 2022 या विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.