राज्यात पुन्हा पाऊस व गारपीट होणार ; विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता म्हणून आयएमडी कडून अलर्ट जारी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय.
उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव, अरबी आणि बंगालच्या उपसागरातून एकत्र येणाऱ्या वाऱ्यामुळं महाराष्ट्रातील काही ठिकाणासंह मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आयएमडीनं 9 ते 13 जानेवारी पर्यंतचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार आज विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो ॲलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विदर्भात गारपीटीची शक्यता
उत्तरेकडील पश्चिम विक्षोभ,अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील 4-5 दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यांच्या प्रभावामुळं मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. 9 ते13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कुठे पाऊस पडणार ?
10 जानेवारी :आयएमडीनं गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीला ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेडला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. तर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना आणि औरंगाबादमध्येही पावसाची शक्यता आहे.
11 जानेवारी : यलो अॅलर्ट : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा , यवतमाळ जिल्ह्यांना लागू असेल. तर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

नांदेडमध्ये पहाटे पाऊस
नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर तालुक्यात आज पहाटे हलक्या पावसाने हजेरी लावलीय, या हलक्या पावसामुळे जिल्हाभरात काहीसा गारठा वाढलाय. या पावसाने शेतात असलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसणार आहे, तसेच आंबा आणि इतर फळबागांना देखील या पावसाने नुकसान होणार आहे.
अवकाळीचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका
आगामी दोन दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि आर्थिक संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं आणखी एकदा नुकसान होण्याची भीती आहे.काल झालेल्या गारपीटीमुळं वर्धा जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..