तर बार आणि दारूची दुकाने करावी लागणार बंद :- राजेश टोपे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- राज्यात सध्या ४० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय असून त्यानुसार मुख्यमंत्री यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावीलागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.९) जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, की राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बध रविवारी (ता.९) रात्रीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे असे अवाहन करत श्री. टोपे म्हणाले की, सध्या राज्यात रोज ४० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. सध्या राज्यात ऑक्सिजनची नगण्य मागणी वाढल्याचे ही श्री.टोपे यांनी यांनी यावेळी सांगितले.