सीएसएमटी आणि कुर्ला रेल्वे स्थानक उडविण्याची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी ) आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर आत्मघातकी हल्ला करण्याचा फोन गुरुवारी रात्री रेल्वे पोलिसांना आला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने रात्रभर सदर परिसर पिंजून काढला.
त्यांच्या हाती काहीच लागले नाही. कॉलरची ओळख रमाकांत ठाकूर अशी झाली आहे. त्याला जबलपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांच्या साऊथ कंट्रोल रूमला हा फोन करण्यात आला होता. ज्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलिसांना देत सदर परिसर तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि अरपीएफने, श्वान पथकाच्या मदतीने सीएसएमटी आणि कुर्ला रेल्वे स्थानकाच्या सर्व प्लॅटफॉर्म परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले.
मध्यरात्रीपर्यंत पोलीस कोणती संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती याठिकाणी दिसते का, याचा शोध घेत होते. तसेच या दोन्ही ठिकाणाहून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच प्रवाशांच्या सामानाची देखील पडताळणी यावेळी करण्यात आली. मात्र, त्यांना काहीच संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे हा खोडकरपणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानुसार कॉलरचा शोध घेण्यास त्यांनी सुरवात केली ज्यात तो जबलपूरचा राहणारा असून कॉल ज्या क्रमांकावरून करण्यात आला त्याचे नाव रमाकांत ठाकूर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस मुख्य आरोपीला लवकरच अटक करणार असून यामागचे नेमके कारण काय हे समजू शकेल, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी ट्विट करत सर्च ऑपरेशनचे फोटो शेअर केले आहेत.

राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?