कालीचरण महाराजांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात १९ डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना रायपूर येथून अटक करण्यात आली होती.
यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता, गुरुवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
कालीचरण महाराज यांच्या वादग्रस्त विधानाबाबत गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाकडून अमोल डांगे यांनी हा अर्ज सादर केला. त्यावर सरकार पक्षाकडून सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले. “आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत. कालीचरणला जामीन झाल्यास या आरोपींना मदत होईल. त्यामुळे कालीचरण याला जामीन नाकारण्यात यावा.”, अशी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..