बलात्काराचा आरोप असणाऱ्या युवकाने केली आत्महत्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ : बलात्काराचा आरोप असणाऱ्या युवकाने दत्तापूर (निरंजन माहूर) येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. मृतकाचे नाव स्वप्निल वसंत खारवडे (२१, रा.यवतमाळ) असे आहे.
यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीमध्ये घरासमोर सायकल चालविणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर स्वप्निल खारवडे याने अत्याचार केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेपासून स्वप्निल खारवडे हा फरार होता. पोलीस त्याच्या शोधात असताना शुक्रवारी त्याचा मृतदेहच तलावातून बाहेर काढण्यात आला.
एचएच २९ – एव्ही २५३१ या क्रमांकाची मोटारसायकल गुरुवारपासून तलावाच्या काठावर उभी होती. ही मोटारसायकल स्वप्निल खारवडे याची असल्याची चर्चा केली जात होती. स्वप्निलने तलावात उडी घेऊन आत्महत्या तर केली नाही ना, याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते. त्यामुळे शुक्रवारी तलावामध्ये रेस्क्यु टीमकडून शोधमोहीम राबविण्यात आली. काही वेळानंतर स्वप्निल खारवडेचा मृतदेह तलावात आढळून आला. या प्रकरणी कळंब पोलीस अधिक तपास करीत आहेत.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….