गेल्या 24 तासात 32 पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1744 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 107
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 07 जानेवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 32 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 96 व बाहेर जिल्ह्यात 11 अशी एकूण 107 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1068 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 32 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1036 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73089 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71194 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 32 रूग्णांमध्ये 11 महिला व 21 पुरूष असून त्यात पुसद तालुक्यात चार, यवतमाळ येथील 27 व इतर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 91 हजार 158 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 17 हजार 734 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.24 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 3 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1744 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 25 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1744 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 25 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 762 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..