अनिल देशमुखांच्या अर्जावर आज सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आल्याच्या 60 दिवसांच्या मुदतीतच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात केला.
तसेच अनिल देशमुख यांची डिफॉल्ट जामीनाची मागणी अयोग्य असल्याचेही ईडीने स्पष्ट केले. यावर उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ईडीने देशमुखांची मनी लॉंड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू करत 21 एप्रिल 2021 रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली.
त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले.
त्या विरोधात बुधवारी न्यायालयात ईडीच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. या आरोपपत्र तसेच पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर डिफॉल्ट जामीन अर्जाचा विचार करता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांची जामीनाची याचिका फेटाळावी, अशी विनंती ईडीने प्रतिज्ञापत्रातून केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..