रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ; आता पोस्ट ऑफिस मध्ये हि होणार रेल्वे टिकीट बुकींग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) एक नवीन योजना सुरु करत आहे.
आता तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. या सुविधेमुळे स्टेशनच्या काऊंटरवर गर्दी होणार नाही. (IRCTC-Post Office)
माहितीनुसार, रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) 6 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या 9147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे रिझर्वेशन तिकीट जारी करण्याची योजना सुरु करतील.
6 जानेवारीपासूनच सर्व राज्यांच्या सर्व ब्रँच पोस्ट ऑफिसपर्यंत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणजे जीडीएस (Gramin Dak Sevaks) प्रवाशांसाठी ट्रेन रिझर्वेशन तिकीट बनवू शकतील.
गोमतीनगर स्टेशनवरून नवीन ट्रेन रवाना करतील रेल्वेमंत्री
6 जानेवारीला रेल्वेमंत्री गोमतीनगर रेल्वे स्टेशनवरून नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. याशिवाय अश्विनी वैष्णव ट्रेनच्या दुरूस्तीसाठी बनवलेल्या वॉशिंग पिट लाईनचे सुद्धा उद्घाटन करतील.
स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी धावतील 75 वंदे भारत ट्रेन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी 75 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. वंदे भारत बनवण्यासाठी टेंडर प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. यामध्ये 9 कंपन्यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे