पुणे जिल्हा बँक च्या निवडणुकी मध्ये अजित पवारांना मोठा धक्का ; भाजपाचे प्रदीप कंद विजय ; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विजयाची नोंद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- बहुजननामा ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेल्या प्रदीप कंद यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या अशा शब्दात निवडणुक प्रचारात टिका केली होती.
त्यामुळे या बहुचर्चित निवडणुकीचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यात प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात १४ मतांनी पराभव केला. (PDCC Election Results)
मुळशी (Mulshi), हवेली (Haveli) पाठोपाठ या गटातही सुरेश घुले यांच्यासारख्या प्रस्थापितांना पराभवाची चव चाखावी लागली असून अजित पवार यांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. (PDCC Election Results)
प्रदीप कंद यांना ४०५ तर सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. विशेष म्हणजे पवार यांच्या बारामतीमध्ये (Baramati) कंद यांना निर्णायक ५२ मते मिळाल्याने कंद यांचा विजय साकार होऊ शकला आहे. प्रदीप कंद यांच्या विजयामुळे भाजपाने जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election) यंदा प्रस्थापित असलेल्या जुन्या संचालकांना पराभवा सामना करावा लागला आहे. सलग २२ वर्षे संचालक असलेले आणि माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (atmaram kalate) आणि १५ वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के (prakash mhaske) यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
मुळशी तालुका मतदारसंघातील मतमोजणीत आत्माराम कलाटे यांना १७ मते मिळाली तर सुनिल चांदेरे (Sunil Chandere ) यांनी २८ मते मिळवून विजय मिळविला आहे.
हवेली तालुका अ वर्ग प्रतिनिधी गटात गेल्या ३ निवडणुकांमध्ये विजय मिळविलेले प्रकाश म्हस्के हे चौथ्यांदा निवडून जाण्यासाठी तयार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत झालेल्या या लढतीत विकास दांगट (Vikas Dangat) यांनी ७३ मते मिळविली तर प्रकाश म्हस्के यांना ५९ मते मिळविता आली.
दांगट यांनी म्हस्के यांचा १४ मतांनी पराभव केला.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
तर ७ जागांसाठी २ जानेवारी रोजी मतदार पार पडले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….