पीएम मोदीं बद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात मृत्यू झालेले शेतकरी माझ्यासाठी मेले का? असं मोदी म्हणाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता.
शेतकरी आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर अमित शहांनी प्रश्न उपस्थित केल्याचा दावा मेघायलयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला होता. आता मलिक यांनी युटर्न घेतला असून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मलिक यांनी म्हटलं की, मी असं म्हटलं नाही की, अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही चुकीचं म्हटलं. अमित शहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतात. त्यांच्याबद्दल काहीच चुकीचं बोलले नाहीत. पण शहांनी हे नक्कीच म्हटलं होतं की पंतप्रधान मोदींना काहीजण चुकीची माहिती देतात. तुम्ही भेटत रहा, एक दिवस त्यांना ही गोष्ट समजेल.
सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा ते अंहकारी वाटले. त्यांनी अमित शहांची भेट घेण्यास सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. दरम्यान, आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मात्र सत्यपाल मलिक यांनी मोदी आणि शहा यांच्यातलं नातं खूप चांगलं असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्यपाल मलिक यांचा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विचारलं होतं की, पंतप्रधान मोदींबाबत मलिक यांनी केलेलं वक्तव्य खरं आहे का? मलिक हे हरयाणातील चरखी दादरीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यामध्ये मलिक म्हणतात की, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्यांच्यामुळे मारले गेले हे मान्य करायला मोदी तयार नव्हते.
नेमकं काय म्हणाले होते मलिक?
दादरी येथील कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी म्हटलं होतं की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी पाच मिनिटांतच माझं त्यांच्याशी भांडण सुरू झालं. मोदी खूप अंहकारात बोलत होते. या आंदोलनामध्ये पाचशे लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांना सांगितलं. यावर मोदींनी ते शेतकरी माझ्यासाठी मेले आहेत का? असं विचारलं. मी देखील त्यांना तुमच्यासाठीच ते मेले असल्याचे सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….