सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खास भेट ; ३२ लाख जणाचा खात्यामध्ये जमाकरणार २ लाख रूपयांपर्यंतची रक्कम…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्र सरकारच्या ३१ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या महिन्यात महागाई भत्ता (DA)च्या एरियरची रक्कम देण्याची शक्यता आहे.
सरकार गेल्या १८ महिन्यांपासून थकीत असलेल्या डीएच्या एरियरचे एकरकमी वाटप करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते.
एका सरकारी रिपोर्टनुसार १ मार्च २०१९ रोजी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३१.४३ लाख एवढी होती. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे डीएचे वाटप १८ महिन्यांपासून झाले नव्हते. आता केंद्र सरकार या १८ महिन्यांच्या डीएच्या थकीत रकमेचे वाटप एकाच महिन्यात क्लीअर करण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर असे झाल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाचवेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळू शकते.
याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कंपनशेशन वाढवण्याचीही तयारी सुरू आहे. याआधी केंद्र सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये डीए आणि डीआर १७ टक्के वाढवून ३१ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..