राज्यपालांच शिवसेनेला दणका ; 1 हजार 844 कोटीचा प्रकल्प चौकशीच्या घेऱ्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकाची आश्रय याेजना चौकशीत अडकली आहे.
भाजपकडून आलेल्या तक्रारीनुसार राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली आहे.
सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आता पर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली आहे.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी याबाबत पत्र पाठवुन विनोद मिश्रा यांना माहिती दिली आहे. मिश्रा यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने 17 डिसेंबर रोजी राज्यपालांची भेट घेऊन ही तक्रार केली होती. या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या प्राथमिक प्रक्रियेने वेग घेतला आहे. कामागारांना स्थालांतरीत करण्याची सुरवात लवकरच होणार आहे. त्यासाठी कामगारांना विशेष अनुदानही देण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत 33 लाख चौरस फुटाचे बांधकाम करायचे ठरले होते. मात्र, कंत्राटदारांच्या इच्छेनुसार पालिकेने 79 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खर्चातही अनेक पटीने वाढ झाली. तसेच, या निवीदाही ठराविक कंत्राटदारांना काम मिळेल अशा पध्दतीनेच तयार करण्यात आल्या होत्या. सफाई कामगारांना चांगली घरे मिळायलाच हवी. पण, सफाई कामगारांच्या नावे भ्रष्टाचार केला जात असून त्याची चौकशी झालीच पाहिजे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….