ठाकरे सरकार मध्ये आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह ; आता यशोमती ठाकुर यांना लागण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सध्या कोरोनाचं सावट गडद झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील नियम कडक करण्यात आले आहेत. एकीकडे ओमिक्रॉन या व्हेरियंटचा धोका आहे तर दुसरीकडे थर्टी फर्स्टमुळे लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे राज्यातील निर्बंध सध्या वाढवण्यात आले आहेत. दुसरीकडे आणखी एक चिंतेची बाब म्हणजे राज्यातील अनेक नेते सध्या कोरोना पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. कालच राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे असे अनेक नेते कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्याच नेत्यांच्या यादीत आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….