भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण ; दोन दिवसापूर्वी झालेल्या विवाह सोहळ्यास खासदार सुप्रिया सुळे ही उपस्थित होती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोरक आलं आहे. कालच त्यांच्या मुलीचा विवाह पार पडला. या लग्न सोहळ्यात अनेक बडे नेते देखील उपस्थित होते. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या निर्बंध लावले असले तरी, अनेक नेत्यांनी आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्याच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांची कन्या तथा बावडा लाखेवाडी ( ता. इंदापूर ) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचा मुंबई येथील हॉटेल ताज मध्ये निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी दि.२८ डिसेंबर रोजी विवाह झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पैकी विवाह सोहळ्यास उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दि. २९ डिसेंबर रोजी कोरोना बाधित असल्याचे आढळले तर हर्षवर्धन पाटील यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून कोरोना तपासणी करून घेतली असता ते कोरोना बाधित असल्याचे दि. ३० डिसेंबर रोजी चाचणी अंती स्पष्ट झाले

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….