केंद्रीय मंत्री नारायण राणेनी बोलावली तातडीची बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कणकवली :- शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटकेची शक्यता असल्याने त्यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे या अर्जाची सुनावणी आज दुपारी होणार असून त्याची प्रतीक्षा राजकीय क्षेत्रांमध्ये आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कणकवलीत प्रहार भवनामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्हा बँक निवडणूक आणि पोलिस कारवाई याबाबत प्रामुख्याने चर्चा होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आमदार नितेश राणे यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. काही माध्यमानी नितेश राणे मुंबई टू गोवा (Mumbai,Goa)असे नारायण राणे सोबत आले होते अशी ही बातमी दिली आहे. मात्र, या बातमीला पोलिसांकडून अजूनही दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे नितेश राणे नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रमावस्था आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….