शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळते.
यापूर्वी सोमवारी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना देखील कोरानाचा संसर्ग झाला आहे.

वर्षा गायकवाड ट्विट करत म्हणाल्या, ‘मला काल संध्याकाळी कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवले त्यानंतर मी कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे. सध्या प्रकृती व्यवस्थित असून सुरक्षेच्या कारणामुळं आयसोलेट करुन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून मला जे भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.’ असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
दरम्यान, सोमवारी काँग्रेस नेते आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना ससंर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. काल के. सी. पाडवी आणि आज वर्षा गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात एकच खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….