माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ ; १० जानेवारी पर्यंत कारागृहात मुक्काम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना १० जानेवारीपर्यंत ऑर्थर रोड कारागृहात मुक्काम कारावा लागणार आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. तर राज्य सरकारने परमबीर यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली.
दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशी दरम्यान निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना कोणतीही आर्थिक मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही बारमालकांकडून पैसे घेतले नाहीत, असा जबाब दिला होता.
तसेच परमबीर सिंह यांनीदेखील प्रतिज्ञापत्रा व्यतिरिक्त काहीही पुरावे नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना जामीन मंजूर होईल याबाबत चर्चा होती. मात्र, तरी देखील त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..