वडगाव येथे बिबट्या च्या हल्ल्यात युवती जागीच ठार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुक्यात वन विभागाच्या खंडाळा बीट मधील वडगाव शिवारातील मंदिरा शेजारी बिबट्याने प्रातविधीसाठी गेलेल्या कु. शितल नागोराव शिंदे (वय २३ वर्षीय) युवतीच्या मानेवर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे वडगाव शिवारातील बिबट्याच्या दहशतने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की खंडाळा बिट वडगाव शिवारात आज सकाळी ६:३० ते ७:०० वाजण्याच्या सुमारास गावातील कु. शितल नागोराव शिंदे (वय २३ वर्षे) रा. वडगाव ही सकाळी प्रातविधीसाठी गावातील मंदिरा शिवारात गेली असताना अचानक त्या ठिकाणी दडून बसलेल्या बिबट्याने या युवतीच्या मानेवर हल्ला करून जागीच ठार केले. असून, तेवढ्यात शेत शिवारात जागलीवर असणाऱ्या काहीजणांनी ओरडाओरड केला असता बिबट्या मात्र तेथून फरार झाला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाला व खंडाळा पोलीस स्टेशनला दिली असता वनकरक्षक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, सापळा लावून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून पकडण्याची मागणी केली जात आहे. तर मृत तरुणीच्या वारसांना तत्काळ आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….