नितेश राणेंना अटक होणार…? सिंधुदुर्ग ते मुंबई पर्यंत पोलिसांची फील्डिंग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांना भोवणार असल्याचं दिसतंय.
कारण, आमदार राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी सिंधुदुर्ग, गोवा विमानतळ आणि मुंबईमध्ये फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. दरम्यान, भाजप आमदार नीतेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. सचिन सातपुतेची चौकशी केल्यानंतर शिवसेनेने भाजप आमदार नीतेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी लावून धरलीय. त्यामुळे कणकवली पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, नीतेश राणे चौकशीला आले नाहीत. त्यानंतर सिंधुदूर्ग पोलिस नीतेश राणे यांच्या घरीही गेले. मात्र, तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नीतेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदूर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नीतेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथेही फिल्डींग लावल्याची माहीती मिळतेय. आज मुंबईत विधान भवनात भाजप आमदार नीतेश राणे उपस्थित राहीले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नीतेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नीतेश राणे यांनाही अटक होणार का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय.
अधिवेशन काळात अटक होणार का? –
अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. महत्वाच्या प्रकरणात अटक करायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. पण, अद्यापही विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली नाही. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….