भाजपाला फक्त एक हजार रुपये द्या :- नितीन गडकरींचा नागरिकांना आव्हान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामासाठी ओळखले जातात. तसेच ते नेहमी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी चर्चेत असतात. आज शनिवारी (ता.२५) त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षाला (BJP) एक हजार रुपयांचा पक्ष निधी दिला आहे.
याबाबत त्यांनी धनादेशाचे छायाचित्र ट्विट करुन माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्विट मध्ये म्हणतात, की विनम्रतेने भारतीय जनता पक्षाला (भाजप) एक हजार रुपयांचा पक्ष निधी दिला आहे.
राष्ट्रवाद, सुशासन, विकास आणि अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आहेत. मी आपण सर्वांना विनंती करतो की आमच्या कॅडरसाठी तुम्ही या प्रकारचे योगदान देऊन त्यांना सक्षम करा. त्यातून निःस्वार्थीपणे देशाची सेवा अविरत करता येईल, असे गडकरी म्हणाले. एडीआर संस्थेने केलेल्या सर्वेनुसार भारतात सर्वाधिक निधी खासगी संस्था, व्यक्ती, कंपन्या यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला आहे. आताच्या घडीला भारतात सर्वाधिक श्रीमंत पक्ष म्हणून भाजपची ओळख निर्माण झाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..