धक्कादायक : अधिवेशन सुरू असताना विधानभवना बाहेर एक व्यक्ती कडून आत्मदहनाचा प्रयत्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कालपासून सुरू झालेले महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन वादळी ठरत आहे. विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी उडत आहे. तर सभागृहाबाहेरही अनेक घडामोडी घडत आहेत.
दरम्यान, आज विधानभवनामध्ये अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच विधानभवनाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास विधान भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना प्रसंगावधान राखत या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र ही व्यक्ती कोण होती, कुठली होती आणि त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न का केला हे, अद्याप समोर आलेले नाही.
सध्या ही व्यक्ती मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याची चौकशी केली जात आहे. मात्र अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….