पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना व्हॉट्अप द्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
जयसिंग राजपूत असं या युवकाचं नाव असून तो सुशांतसिंग राजपूतचा जबरा फॅन आहे. बंगळुरूच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी 34 वर्षीय आरोपीला जेरबंद केलं. अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्युमुळे या आरोपीला अतिशय दु:ख झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
आरोपी जयसिंग राजपूतने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्यामध्ये, सुशांतसिंगच्या मृत्यूबाबत आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आदित्य ठाकरेंना तीन फोनही केले. तसेच, फोनवरुन मेसजद्वारे जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने तपास यंत्रणा कामाला लावली. बंगळुरू पोलीस पथकाने 18 डिसेंबर रोजी आरोपीला अटक केल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
मुंबईच्या सायबर सेल पथकाने आरोपीच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतला असतो तो बंगळुरू येथे असल्याचं समजले. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन आरोपी जयसिंग राजपूत यास अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….