एमपीएससी चा ढिसाळ कारभार ; आयोगाकडून उत्तरसुचित चुकीचे उत्तरे ; बरोबर उत्तर दिलेले प्रश्न रद्द केल्यामुळे विद्यार्थी नापास…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या गट ‘ब’ च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत अनेक चुका आढळून आल्या आहेत.
मात्र या मध्ये दुरुस्ती करण्याऐवजी आयोगाने बरोबर उत्तरे असलेले प्रश्नही रद्द केले. याचा मोठा फटका राज्यातील परीक्षार्थींना बसला आहे. हे प्रश्न रद्द केल्याने निगेटिव्ह मार्किंगमुळे राज्यातील जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी नापास झालेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंडपीठात आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आयोगाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 20 डिसेंबरला होणार सुनावणी होणार आहे.
उत्तर पत्रिकाही करावी लागली प्रसिद्ध
आयोगानं घेतलेल्या या संयुक्त पूर्व परीक्षेत झालेल्या चुकीमुळे आयोगला पहिल्यांदाच तिसरी उत्तरसूची सुध्दा प्रसिद्ध करावी लागली. मात्र तिसऱ्यांदा ही उत्तरसूचीमध्ये काही बरोबर प्रश्न रद्द करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम झाला आहे. 3 ते 4 हजार मूलांचे 0.25 ते 3 गुण कमी झालेत. आयोगाच्या चुकीची शिक्षा विना कारण विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम
कोरोनामुळे आधीच परीक्षा ना झाल्याने विद्यार्थ्यांची तब्बल दोन वर्षे वाया गेली आहेत. कोरोनानंतर आता पहिल्यांदाच परीक्षा झाली तर त्यात या चुकांमुळे अनेक मुलांना मुख्य परीक्षेची मिळणारी संधीही हुकणार आहे. या सगळयाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला, असून अनेक विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….