हिंगोलीत आंदोलनात सहभागी असलेले एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या महिनाभरापासून आंदोलन सूरू आहे. सरकारने पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही शासनात विलीणीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
राज्यातल्या वेगवेळ्या ठिकाणी आजही कामगारांचं आंदोलन सूरू आहे. याच हिंगोलीतून आता एका नकारात्मक बातमी समोर आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सोमवार पर्यंत कामावर हजर होण्यातं आवाहन केलं होतं. मात्र तरी देखील कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा राज्य सरकारने दिला होता. मात्र अनेक ठिकाणी आंदोलन सूरू आहे. त्यातच आज हिंगोलीमध्ये आंदोलनात सहभागी असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर. बी. बेंद्रे नावाच्या या कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या कळमनुरीमधील बस आगारात ते वाहक म्हणून काम करत होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात पहिल्या दिवसापासून बेंद्रे सहभागी होते. त्यांना आगारातील अधिकारी वारंवार कामावर येण्याचा तगादा लावत होते. तर याच अधिकाऱ्यांनी कामावर या अन्यथा कारवाई करू अशी धमकी दिल्याने ही घटना घडल्याचा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे.