पुसद येथे पतीने केला पत्नीचा कुऱ्हाडीने खून…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील विटाळा वॉर्डात घरगुती वादातून पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
रेखा नारायण खराबे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून पती नारायण यादवराव खराबे (वय ४०, रा. विटाळा वॉर्ड) पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुसद शहरातील विटाळा वॉर्ड येथे रहिवासी असलेल्या नारायण यादवराव खराबे आणि पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी रात्री घरगुती कारणावरून घरात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाली. पती नारायणने रागाच्या भरात पत्नी रेखाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर पती नारायण पसार झाला.
घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर रेखाला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केले. उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….