ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुक घेऊ नये ; भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी प्रवीण दरेकर यांनी घेतली निवडणुक आयुक्तांची भेट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेतली. या वेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विरोधी प्रवीण दरेकर उपस्थिती होते.त्यांनी निवडणुका न घेण्याबाबत आयुक्तांना निवेदन दिले.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटाबाबतची राज्य सरकारची याचिका देखील फेटाळून लावली आहे. तसेच येत्या काही दिवसांत होणारी भंडार-गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक देखील खुल्या प्रवर्गातून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. पण, या निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी भाजपसह राज्य सरकार देखील आग्रही आहे.
राज्य सरकारने न्यायालयात योग्य भूमिका मांडली नाही. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे, असे आरोप भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाजावर अन्याय होईल, असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, या मागणीसाठी आज भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार उपस्थित होते.