मुलींची लग्नाची वयोमर्यादा वाढवून २१ वर्षे करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नवाब मलिक यांची टिका ; म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. मुलींचे लग्नाचे वय मर्यादा 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्यावर चर्चा झाली.
या संदर्भातील विधेयक यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. सरकारने केलेल्या या निर्णयाचे बऱ्याच लोकांनी स्वागत केले आहे तर बऱ्याच लोकांनी यावर नापसंती व्यक्त केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचादेखील समावेश आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयावर टीका करताना नवाब मलिक म्हणाले की, आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे आहे आणि पुरुषांचे 21 वर्ष आहे. तर आता मुलींचे लग्नाचे वय 21 झाले तर पुरुषांचे काय 25 कराल का? एका लग्नामध्ये स्त्रीच्या आणि पुरुषाच्या वयामध्ये अंतर असणं आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात की, 18 वर्षामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. त्याच वेळी तुम्हाला सज्ञान व्यक्ती म्हणून देखील घोषित केले जाते. अशा वेळी आपल्या विवाहाचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय देशामध्ये कोणताही विवाह होऊ शकत नाही. तुम्हाला मला काय वाटतं, यापेक्षा जनतेला काय वाटतं. हे इथे महत्त्वाचे आहे. आपला देश हा अविवाहित लोकांच्या हातात आहे. आणि ते लग्नाविषयी गंभीर कसे असू शकतात? असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..