सीटीईटीच्या दि.16 डिसेंबरचा दूसरा पेपर रद्द ; सर्व्हर डाउन असल्याचे दिले कारण ; परीक्षार्थी मध्ये संताप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत.
ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारी पर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तथापि, पेपरफुटीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसऱ्या शिफ्टसाठीही परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. विद्यार्थ्यांना केंद्रावर नियमित तपासणी करून प्रवेशही देण्यात आला. परंतु 2.30 वाजूनही परीक्षा काही सुरू झाली नाही. सुमारे तास-दीड तास विद्यार्थ्यांना बसवून ठेवल्यानंतर दुसऱ्या पेपरची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना यासाठी तांत्रिक अडचणींचे कारण सांगण्यात आले. सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या शिफ्टचा पेपर देशभरात बहुतांश ठिकाणी रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षा पुढे ढकलल्याची नोटीस डकवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.