‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ निमित्त 18 डिसेंबरला ऑनलाईन मार्गदर्शन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 15 डिसेंबर :- अल्पसंख्याक नागरीकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने दिनांक 18 डिसेंबर हा ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 18 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव, माहिती देण्यासाठी तहसिलदार डॉ. संतोष डोईफोडे, तसेच अॅड. जयसिंग चव्हाण व ॲड. इमरान देशमुख यांचे ऑनलाईन वेबिनार द्वारे मार्गदर्शन आयोजीत करण्यात आलेले आहे.
कोव्हीड-19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभुमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार लोक सहभागाबाबत योग्य खबरदारी घेवुन सदर मार्गदर्शनपर कार्यक्रम 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. https://meet.google.com/cgz-ritt-fku या लिंक द्वारे उपलब्ध होणार आहे. तरी सर्वांनी सदर कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….