विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त पद्धतीने न होत आवाजी मतदानाद्वारे होणार असल्याची चर्चा आहे.
येत्या 22 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही निवडणूक खुल्या पद्धतीने होणार आहे. विधिमंडळ नियामक समितीकडून याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार ही निवडणूक खुल्या पद्धतीने होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी गोपनीय पद्धतीने मतदान करण्यात येत होते. यासंदर्भात नियमात जे बदल केले आहेत. त्याचा अहवाल नियम समितीच्या समोर सादर केला जाईल. हा अहवाल अधिवेशनाच्या काळात पटलावर ठेवला जाईल. यावर हरकती मागवल्या जातील.
हरकती आल्यावर अंतिम अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल. पुढे इतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर राज्यपाल निवडणुकीची तारीख जाहीर करतील. त्यानुसार निवडणूक जाहीर होईल असे सांगण्यात येते.