उमरी पठार येथील वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ; 110 वृद्धांची आरोग्य तपासणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 09 डिसेंबर :- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रम मार्फत संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार ता. आर्णी जि. यवतमाळ येथे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य, मानसिक तपासणी, भौतिक उपचार शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर कार्याक्रमामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्वाना शुभेच्छा देत कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबिरामध्ये एकुण 110 वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्व वृद्धांचे ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, रक्त तपासणी, मानसिक तपासणी, मौखिक तपासणी तसेच इतर शारिरीक तपासण्या करण्यात आल्या असून या कार्याक्रमामार्फत सर्व वृद्धाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. यात शॉल, कपडयाची साबण, अंघोळीची साबण, खोबऱ्याचे तेल, बिस्कीट पुडा, झंडू बाम , विक्स, गरम पाण्याची पिशवी, आयोडेक्स, व्हॅसलीन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले तसेच वृद्धांसाठी पुरणपोळीच्या भोजनाचा कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला.
सदर शिबिरामध्ये दूरदृ्ष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे, सहसंचालक (असंसर्गजन्यरोग) डॉ. पद्मजा जोगेवार, सहायक संचालक डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस. चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सुहास कोरे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी वृद्ध व्यक्तींनी आपली काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच श्री संत दोला महाराज वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे यांनी वृधाश्रामाबाबत माहिती देत त्यांचे मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ. तरंगतुषार वारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनील भवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगल्पल्लेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रीती दुधे, संत श्री डोला महाराज वृद्धाश्रम येथील संचालक शेषराव डोंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश कांबळे, जिल्हा सल्लागार डॉ. मनाली बांगडे, मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप भटकर, दंत शल्य चिकित्सक, डॉ. विजय सारडा, डॉ. शोएब अकबाणी, डॉ. महेंद्र वानखेडे, तसेच फिजिओथेरपिस्ट, डॉ. विद्युत राठोड, रंजिता बावणे, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ सरफराज सौदागर, समुपदेशक मोहित पोहेकर, सामाजिक कार्यकर्ता सागर परोपटे, अधिपरिचारिका दीप्ती कडूकार, रेखा पिंपळकर, श्रीमती शेख आणि श्रीमती गवई, नर्सिंग कॉलेज च्या नर्सिंग ऑफिसर श्रीमती राठोड, श्रीमती मेश्राम, स्वाती जारुंडे व त्यांची टीम तसेच ग्रामीण रुग्णालय आर्णी व प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी येथील सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरफराज सौदागर यांनी केले.