10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी ; राज्य मंडळाने घेतला मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वीची मुदत गुरुवार (ता. ९ डिसेंबर २०२१) रोजी संपत होती. ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणाऱ्यांना लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या 20 डिसेंबर 2021 पर्यंत, तर विलंब शुल्कासह 21 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
माध्यमिक शाळांमध्ये सरल डेटा बेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज केल्यानंतर 2 जानेवारी 2022 पर्यंत शाळांमार्फत विद्यार्थ्यांचे चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरता येणार आहेत. शाळांनी माध्यमाकडे प्री-लिस्ट जमा करण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी 2022 पर्यंत आहे.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरले जात असले, तरी विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांद्वारेच फॉर्म भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….