केवळ लष्करच नव्हे , तर अवघा देश या घटनेने मुळे हादरला आहे :- राज ठाकरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात खळबळ उडवून देणारी एक मोठी दुर्घटना काल तामिळनाडूमध्ये घडली. तमिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात कन्नूर मध्ये दुर्घटना घडली आहे. सेनेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे.
असे सांगितले जात आहे की, त्यामध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते. त्याचसोबत बिपिन रावत यांची पत्नी सुद्धा यावेळी त्यामध्ये होती.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. यानंतर आता या अपघातातील एक मोठी बातमी समोर आली होती. या अपघातात जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचाही या अपघातात मृत्यू झाला. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली.
राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले की,’आपल्या देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीनजी रावत यांना एका अत्यंत दुर्दैवी अपघातात आपण गमावले आहे. तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांच्या पत्नी आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे. लष्कराच्या माध्यमातून या सर्वांनी केलेली देशसेवा आपण कधीही विसरू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अपघातातील मृत्यूमुखींना भावपूर्ण श्रद्धांजली.’

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….