दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं ; मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :- दिल्लीतू मोठी बातमी येत आहे. मागील 378 दिवसांपासून सुरू असणारं शेतकरी आंदोलन संपल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी आता मागे घेतलं आहे.
केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने शेतकऱ्यांच्या पूर्ण केलेल्या मागण्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. एमएसपी आणि आंदोलक शेतकर्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील अशी माहिती केंद्राने या पत्रातून दिली आहे.
एमएसपीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्र्यांनी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत. देशातील शेतकऱ्यांनी एमएसपी कशापद्धतीने मिळेल हे यामध्ये निश्चित केलं जाईल. सरकारने चर्चेवेळी आधीच याबाबत आश्वासन दिलं आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबबत केंद्र सरकारने म्हटलं की, युपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा सरकारने हे गुन्हे मागे घेण्यात येतील हे स्पष्ट केलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….