कलाकारांनी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घ्यावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे जिल्ह्यातील कलाकारांना आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 08 डिसेंबर :- कोविड-19 पार्श्वभुमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार व संस्था यांना कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाचे सांस्कृतीक कार्य विभाग यांचे शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2021 नुसार घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येणार असून जिल्ह्यातील कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
एकल कलाकार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी समितीचे सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी राजेश देवते, नगरपालिका प्रशासन अधिकारी सतिश गावंडे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, सहाय्यक माहिती अधिकारी गजानन जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की एकल कलाकारांचे अर्ज संबंधीत तहसिलदार यांनी स्विकृत करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. तसेच समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे परस्पर अर्ज सादर करावा.
एकल कलाकारांकरीता पात्रता निकष व अटी नुसार महाराष्ट्र प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार अर्ज करण्यास पात्र असतील. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. इच्छुक कलाकारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील दहा दिवसात संबंधीत तहसिल कार्यालयात सादर करावा.
सदर योजनेचा शासन निर्णय, अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in यावर तसेच यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ www.yavatmal.gov.in यावर तसेच http://www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….