आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हाण :
पुसद :
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुसद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मुस्लिम समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या वक्फ मंडळ ही राज्यातील सर्वात मोठी संस्था असून या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. वजाहत मिर्झा यांची निवड झाल्याबद्दलअल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या वतीने डॉ. वजाहत मिर्झा यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्यस्थितीत १० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.तर आता अध्यक्षपदाचीही निवड झाल्याने वक्फ मंडळ आता संपूर्ण क्षमतेने कामकाज करु शकेल. त्यामुळे मंडळाच्या तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या निवडीमुळे पुसद तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे त्यामुळे त्यांना पुढील वाटाचालीसाठी त्यांच्यावर जिल्ह्याच्या व तालुक्याच्या वतीने शुभेच्छा वर्षाव होत आहे.