प्रेरणास्थळी राज्यपाल कोश्यारींचे स्वातंत्र्य सैनिक स्व.जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.25 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 25 नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या 24 व्या स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे,माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किर्ती गांधी व यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायिका हरगुण कौर, गायक प्रशमेश लघाटे, स्थानिक कलावंत व वाय.पी.एस.स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्व.जवाहरलाल दर्डा यांना भजन व भक्तीगीतातून आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी प्रेरणास्थळ परिसरात वृक्षारोपण केले व नोंदवहीत अभिप्राय नोंदविला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..