दिग्रस शहरात आठ लाखांचा सुगंधित तंबाखूसह गुटखा जप्त, पोलिसांनी धडक कारवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :
दिग्रस पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल आठ लाखाचा सुगंधित तंबाखू गुटखा जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार ही कार्यवाही अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सह कलम १८८,३२८,२७२,२७३,३४ भादवी नुसार गोपाल महोरे अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास दिगांबरराव मकेश्वर (४२),हुसेन शहा रमजान शहा (५७) रा.अमरावती , याकुब बिलाल लोधा (४०), इरफान(३०), मुसा बाळापुरे (४०) ,साबीर परसुवाले(३५) रा. दिग्रस, जावेद खान रा.विजय गुड गॅरेज अमरावती असे आरोपींची नावे आहेत.
तर या कार्यवाहीत विमल पान मसाला 65 पॅकेट असलेले वीस पोते प्रत्येकी पॅकेट किंमत रुपये 150 प्रमाणे एकूण किंमत रुपये 195000/(2)व्हि 1 सुगंधित तंबाखू चे 65 पॅकेट असलेले विस पोते प्रत्येकी पॅकेट किंमत रुपये तीस प्रमाणे एकूण किंमत रु 39000/.(3) गोल्ड सुपर गधित
तंबाखूचे प्रत्येकी 500 ग्रॅम ची 420 पॅकेट प्रत्येकी रुपये तीनशे प्रमाणे एकूण किंमत रु 126000 (4) बब्बू गोल्ड सुगंधीत तंबाखूचे प्रत्येकी पाचशे ग्रॅमचे शंभर पॅकेट प्रत्येकी रुपये तीनशे प्रमाणे एकूण किंमत रुपये 30000/.(5) सितार गुडघ्याचे 13 20 पॅकेट प्रत्येक पॅकेट किंमत रुपये 150 प्रमाणे एकूण किंमत रुपये 198000/.(6) ईगल सुगंधित तंबाखूचे प्रत्येकी 40 ग्रॅम वजन असलेले दहा पॅकेट चे एक पॅकेट असे 156 पॅकेट प्रत्येकी रुपये पाचशे चाळीस प्रमाणे एकूण किंमत 84240 असा सर्व प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा किंमत रुपये 672240 छापील किमतीनुसार आढळून आला तसेच वाहन क्रमांक एम एच 05 के 8996 किंमत अंदाजे 800000/.रु. अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. दिग्रस पोलिसांनी धडक कारवाई केल्याने सुगंधित गुटका व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत