विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रस्ताव 31 डिसेंबरपुर्वी सादर करावे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.28 ऑक्टोबर :- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र इ. व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता आपला अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज व सर्व मुळ कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ या कार्यालयात दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावे.
तसेच सन 2022-23 मध्ये आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी यवतमाळ जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचीत राहू नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, यवतमाळ या समितीकडे दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज दाखल करावा. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच सदर अर्ज स्विकारले जाणार नाही.
समिती कार्यालयामार्फत ऑगस्ट 2021 पर्यंत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव प्रकरणात निर्णय घेण्यात आले आहेत. अर्जदारांनी www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अर्जात नमूद ई-मेलवरून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीप राठोड यांनी केले आहे.