यवतमाळ जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करा ; ग्राम संवाद सरपंच संघाचे निवेदन सादर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे :- 9370464824
दिग्रस :-
यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या १५ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाल्याने शेतातील सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्व नदी, नाले व तलाव पूर्णपणे भरल्याने पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, शेतकऱ्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे, त्यामुळे तात्काळ पिक विमा मंजुर करण्यात यावा. तसेच सरसकटपणे हेक्टरी ५० हजार रुपये मंजुर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार जयेंद्र बन यांच्याकडे बुधवार दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी देण्यात आले.
निवेदन देतेवेळी विठ्ठल आडे, बाबाराव पवार, दिनदयाळ चौधरी, पुरुषोत्तम कुडवे,मनीषा यादव गावंडे,अभिलाषा नितीन इंगोले, संगीता केशव राठोड, विठ्ठल जाधव,किरण यादव पवार, गीता साहेबराव चांदावत,सुभाष वामन जाधव,सरस्वती अभय इहरे, नंदा संजय काळे,भाग्यश्री पांडुरंग गोरे,निशा युवराज राठोड, सुनीता दिनेश भड, राहुल सोरते, यमुना जयसिंग जाधव,नेहा नारायण गव्हाणे,गजानन उत्तम गावंडे,पल्लवी मांगीलाल जाधव,किशोर चव्हाण,उमेश राऊत,माधुरी देविदास गायमुखे, धनराज हटकर,संतोष चव्हाण, संजय चव्हाण, रामचंद्र वाघमारे, विद्या दीनदयाल चौधरी,रविकांत निकम, किशोर पवार,ज्योत्स्ना विठ्ठल जाधव,धृपता मधुकर राठोड, नेहा नारायण गव्हाणे सह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..