चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम (अनिल बोम्पीलवार) :-
नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर हिवरा संगम या गावाजवळ श्री एकवीरा देवी , मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आज दिनांक 28 ला सकाळी नऊच्या दरम्यान पुसद आगाराची माहूर पुसद एम एच 6 एस8035 या क्रमांकाच्या बसचे मागील चाक अचानक निखळून पडले. ही बस चालवत असलेले चालक शंकर चव्हाण यांच्या लक्षात ही बाब ताबडतोब आली निखळलेले चाक सुमारे शंभर ते दीडशे फुटावर जाऊन पडले होते अशाही परिस्थितीत त्यांनी बसवर नियंत्रण करत ही बस रस्त्याच्या कडेला ताबडतोब उभी केली. त्यामुळे मोठाअनर्थ टळला. यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी झाली असती. सदर बसमध्ये एकूण सात प्रवासी आणि वाहक चालक होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळेच प्रवाशांचे प्राण वाचले त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडून सदर चालक व वाहक सौ. सीमा पवार यांचे आभार मानले. चालकाच्या प्रसंवधानामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सदर स्थळ हे अतिशय अपघात प्रणव स्थळ बनले असून याठिकाणी यापूर्वीही बरेच अपघात झाले आहे व जीवित हानी सुद्धा झाली आहे.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..