क्रिडा, एन.सी.सी. व स्कॉऊट गाईड एकाच छताखाली आणणार :- क्रिडा मंत्री सुनिल केदार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 सप्टेंबर :- क्रिडा, एन.सी.सी. व स्कॉऊट गाईड हे सर्व विद्यार्थी जीवनाशी संबंधीत असलेले विषय असून त्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी एन.सी.सी. व स्कॉऊट गाईड यांना देखील क्रिडा संकुलात कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा क्रिडा संकुल येथे क्रिडा मंत्री सुनिल केदार यांनी आज भेट दिली. यावेळी आ. मदन येरावार, जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी सुनिल केदार यांनी जिल्हा क्रिडा संकुलाची पाहणी केली. बॅटमिंटन हॉल मध्ये फोनिक्स 4 मि.मि. चे फोम बसविण्याच्या सूचना दिल्या तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी रोलींग चेअर लावण्यास मंजूरी देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी उपलब्ध खेळ सुविधांची पाहणी केली तसेच काही ठिकाणी आवश्यक बदल करण्याबाबत अनुषंगीत सूचना दिल्या. कबड्डी आणि रायफल सुविधेसाठी आकाशवाणी जवळील मैदानावर सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या तसेच बि.एड. कॉलेजचे ग्राऊंड क्रिडा विभागाला हस्तांतरीत करून तेथे इतर मैदानी खेळ सुरू करता येतील काय याबाबत चाचपणी करण्याचे सांगितले.
यावेळी क्रिडा विभागाचे अधिकारी, क्रिडा प्रशिक्षक व मार्गदर्शक उपस्थित होते…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….