मराठा समाजाची राज्य शासनाकडून फसवणूक ; पुन्हा आंदोलन- संभाजी राजे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
आरक्षण आणि अन्य प्रश्नावरून सरकार मराठा समाजाची फसवणूक करीत आहे. राज्य सरकारने पाठविलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहिले असून मुख्यमंत्र्यानी देखील याची पुरेशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे समाजाने शांततेच्या मार्गाने
केलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेणार नसेल तर पुन्हा तीव्र आंदोलन करू ,असा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला आहे.
शासनातील अधिकारी मुख्यमंत्री आणि सरकारला अंधारात ठेवत असून सारथीला पुरेसा निधी दिला जात नसल्याचा गंभीर आरोपही राजे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्राद्वारे संभाजीराजे यांना दिली होती.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रानुसार सरकारकडून मराठा समाजाच्या आंदोलनाकडे होणारे दुर्लक्ष पाहून कंटाळलो आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आणि समन्वयक यांना वेठीस धरण्याऐवजी समाजाने परवानगी दिल्यास मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनास बसायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रातील एकूण १५ मुद्दय़ांमध्ये ज्या निर्णयांबाबत माहिती दिली आहे, त्याने आपले मुळीच समाधानी नसल्याचा संताप संभाजी राजेंनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….