फुलसावंगीत पोलिसांचा रुटमार्च ; शांततेला नख लावणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही : ठाणेदार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :७२४९४४४८८८
महागाव :
गणेश उत्सव आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महागाव पोलिसांनी फुलसावंगीत रुटमार्च काढला.तसेच दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेला नख लावणाऱ्यांची गय केल्या जाणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी केले.
बसस्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , जामा मस्जिद चौक , ग्रामपंचायत कार्यालयात , आणि गणपती मिरवणूक मार्गाने संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून फिक्स पॉइंट लावण्यात आले होते.

या रंगीत तालीम आणि रुटमार्च मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, उपनिरीक्षक राहुल वानखेडे , गुप्त विभागाचे अर्जुन राठोड सह २५ पोलीस कर्मचारी , १० रेल्वे पोलीस कर्मचारी , २५ गृहरक्षक , २५ पोलीस मित्रांच्या साहाय्याने हा रुट मार्च यशस्वी करण्यात आला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….