वाई बाजार येथील छञपती चौकात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाई बाजार (राजकिरण देशमुख) :-
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ साली झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा दिवस सर्वात मंगलमय दिवस आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.
वाई बाजार येथील छञपती शिवाजी महाराज चौकातील अर्धाकृती पुतळ्याजवळ दि. ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन आयोजित कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित शिवप्रेमी बांधवांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दुग्धभिषेक करुन स्नान घालून पूजन करुण अभिवादन केले व जय जिजाऊ जय शिवरायच्या गजरात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,ग्रा,.पं सदस्य उदय नाईक,मुनवर खान,प्रमोद शिंदे,डाॅ.अजय लुटे,बंडु कलाणे, पत्रकार कार्तिक बेहेरे पाटिल,पत्रकार प्रशांत शिंदे,वाई बा.संभाजी ब्रिगेड शाखाध्यक्ष राजु शिंदे,सागर देवकर,बाळु चव्हाण,अमन पठान,गजु केळकर,बबलु जाधव,अकाश सातव,राजु जाधव,शिवम कलाणे,रघुविर कलाणे,बालाजी राऊत यांच्यासह अनेक शिवप्रेमी बांधवांची उपस्थित होती.
महाराष्ट्राच्या इतिहासात ६ जून हा सर्वात मंगलमय दिवस आहे. ६ जून १६७४ या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. त्यामुळे दरवर्षी ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे राज्यशासनाने निर्णय घेतला आहे.त्यामुळे ग्रा.पंचायत, पंचायत समिती व जि.प. कार्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..