म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 :- ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा ‘म्युकरमायकोसीस’ हा आजार बुरशीजन्य सुक्ष्म जंतुमुळे होतो. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांनी लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोणाला होतो हा आजार : रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, मधूमेह, कोरोनारुग्ण, जंतुसंसर्ग असणा-यांना तसेच अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना आणि कर्करोग असणा-या रुग्णांचा म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता असते.
आजाराची लक्षणे : डोळ्या व नाकाभोवती दुखणे व लाल होणे, ताप, नाकातून रक्तस्त्राव, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या, दात दुखणे, जबड्यावर सुज येणे, लकवा, मिरगी.
कसा होतो हा संसर्ग : रुग्णालयात ऑक्सीजन देतांना ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर भरणे आवश्यक असते. तसेच एसी वेळोवेळी स्वच्छ व निर्जंतणूक करणे आवश्यक आहे.कोरोना रुग्णाच्या घरातून सुध्दा हा संसर्ग होऊ शकतो.
काय करावे : लक्षणे दिसू लागताच त्वरीत नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डायबिटीज कंट्रोल ठेवणे, कोव्हीडनंतर डायबिटीज तपासणी करावी. स्टेरॉईडचा वापर योग्य प्रमाणात करावा. ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर वापरावे. योग्य प्रमाणात ॲन्टीनमोटीक्सचा वापर करावा. मास्क नेहमी वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.
००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….