केंद्र सरकारच्या खत भाव वाढीच्या निषेधार्थ माहुर तालुक्यात ताली-थाली बजाव आंदोलन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहुर (राजकीरण देशमुख) :- तालुक्यातील हडसणी येथे मा. राज्य मंत्री बच्चू भाऊ कडु यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या खत दर भाववाढ व तुर मुग उडीद इत्यादी मालावरचे निर्बंध उठवावे. अश्या मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या निर्णयाला जाहीर निषेध करत ताली थाली बजाव आंदोलन करण्यात आले.
आंदोलन करताना शारीरिक अंतर ठेवून व शासनाने घातलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हे अंदोलन करण्यात आले.
आज सर्व देश भरा मध्ये कोरोना सारख्या महामारी ने थैमाने घातले आहे. आणि दुसरी कडे केंद्र सरकारने खताचे भाव वाढुन काय देशाच्या बळीराजाला जिवणातून उठावायेचे ठरवले काय असे सर्व शेतकरी बांधवा मध्ये चर्चा आहे.
त्या वेळी उपस्थित दिव्यांग संघटना चे माहुर तालुका अध्यक्ष किशोर भाऊ हुडेकर, तसेच गावातील शेतकरी बांधव.
अनंतराव उपासे, रवी कासोळकर, अमोल शिंदे, किशनराव जाधव. व ईतर शेतकरी हजर होते।