गळफास घेवून तरुणाची आत्महत्या ; सवन्यात शोककळा….

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या ; सवन्यात शोककळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
तालुक्यातील सवना येथील नवविवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना सकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली आहे.अक्षय निरडवार (२७) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
अक्षय याचा विवाह मागील वर्षी जवळा येथील तरुणीशी झाला होता.नेहमीप्रमाणे अक्षय आपल्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर झोपला.अचानक सकाळी उठून घरी असलेल्या खालच्या मजल्यातील खोलीत दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.अक्षय यास मागील २ महिन्यापूर्वी मुलगा झाला होता.त्याने अचानक उचलल्या टोकाच्या पावलाने सवना गावात शोककळा पसरली आहे.आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,आई,वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….